मालेगाव : वार्ताहर मालेगावमधून वाहणाऱ्या गिरणा नदीवर केटीवेअर बंधारा बांधण्यात आला असून , पुरामुळे त्यावरून पाणी वाहत आहे . याच पुराच्या पाण्यात गिरणा नदी पुलावरून किल्ला परिसरात वाहणाऱ्या नईम मोहम्मद आमिन या तेवीस वर्षीय तरुणाने उडी मारली . मात्र , या तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही . याच केटीवेअर बंधाऱ्यावर अनेकजण स्टंटबाजी करत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत . त्यामुळे पूरपरिस्थितीत या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात यावा , अशी मागणी होत आहे . सध्या कळवण , बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने तेथील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असल्याने गिरणा नदीला मोठा पूर आला आहे .
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…