विद्यार्थिनींच्या वर्गासमोर तरुणाचे अश्लील कृत्य

मनपा शाळेची सुरक्षा वाऱ्यावर-सुरक्षा वाऱ्यावर; संशयित अटकेत

सातपूर: .सिध्दार्थ लोखंडे
-श्रमिकनगर कार्बन नाका येथील मनपाच्या श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात ९वीच्या विद्यार्थिनींसमोर वर्गाबाहेरून एका इसमाने शुक्रवारी (दि. २९) सायंकाळी साडेचारच्या दरम्यान अश्लील कृत्य करत छेडछाडीचा प्रकार घडला

युवकाच्या या घानरड्या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी तत्काळ शिक्षकांकडे जाऊन तक्रार केली. संशयितास शालेय आवारात अश्लील कृत्य करत असताना चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  संतोष इंगळे असे या संशयिताचे नाव असून, तो अशोकनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करतो. या प्रकारामुळे शालेय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नेमका हा इसम शाळेच्या परिसरात घुसला कसा त्यावेळी शाळेचे सुरक्षारक्षक होते कुठे याचा देखील तपास लावण्याची मागणी नागरिक करीत आहे.पाच एकर शाळेच्या परिसरात अवघे दोनच सुरक्षारक्षक आहे. त्यामुळे शाळेत सुरक्षारक्षक व पूर्ण क्षमतेने शिक्षकांची नियुक्ती करावी. तसेच अशा टवाळखोरांवर कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *