लासलगावला कांदा विक्रीस आलेला युवक वाहनासह बेपत्ता

लासलगावला कांदा विक्रीस आलेला युवक वाहनासह बेपत्ता

लासलगाव प्रतिनिधी

पाटोदा ता.येवला येथील समाधान अर्जुन घोरपडे वय २९ हा लासलगाव बाजार समितीत कांदा विक्रीस आला असता लिलावानंतर वाहनासह गायब झाला आहे.
याबाबत त्याचा चुलत भाऊ राहुल ज्ञानेश्वर घोरपडे यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या मिसिंग अर्जात,दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता समाधान अर्जुन घोरपडे रा.पाटोदा ता.येवला हा त्याची महिंद्रा जीतो एम.एच.१६ ए.जी.९०५१ या मालवाहतूक गाडीत घरचे कांदे घेऊन लासलगाव बाजार समितीत विक्रीस आला.कांदा लिलाव झाल्यानंतर दुपारी २.३० च्या सुमारास त्याची अर्जदार चुलतभाऊ याच्याशी भेट झाली व मी घरी जातो असे सांगितले मात्र, अर्जदार सायंकाळी घरी आल्यावर वडील अर्जुन घोरपडे यांनी समाधान अजून घरी आला नाही तू त्याला पहिले का ? असे विचारले असता तो मला भेटला व घरी जातो असे सांगितले. नंतर त्याच्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता. त्यानंतर अर्जदार व त्याचे मामा गोपाल श्रीधर मेमाणे व समाधान याचे वडील अर्जुन घोरपडे हे सर्व पाटोदा, लासलगाव पंचक्रोशी तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.

समाधानचा रंग गोरा, चेहरा उभट, बांधा मध्यम, दाढी काळी व वाढलेली, उजव्या कानात सोन्याची बाळी, हाताता चांदीचे ब्रासलेट, अंगात सफेद रंगाचा शर्ट व रंगाची पॅन्ट, पायात बुट असे वर्णन आहे. सोबत पाढरे रंगाची महिंद्रा जितो मालवाहतुक गाडी क्र. एम. एच. १६ ए. जी. ९०५१ आहे असे म्हटले आहे. अधिक तपास स.पो.नि भास्करराव शिंदे यांच्या मर्गदर्शनखाली सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *