उत्तर महाराष्ट्र

पोषण आहार शिजवतांना अचानक आगीचा भडका

लोहोणेर : प्रतिनिधी
लोहोणेर येथील श्रीराम मंदिरा लगत असलेल्या अंगणवाडी मध्ये पोषण आहार शिजवत असतांना अचानक आगीचा भडका उडाला मात्र यावेळी प्रसंगावधान राखत अंगणवाडी तील लहान बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ व जीवित हानी टळली असली तरी सदर अंगणवाडीत गॅसचा दुसऱ्यादा स्फोट घडण्याचा प्रकार घडला असल्याने शंकेची पाल चुकचुकली असून याबाबत योग्य ती चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत घडलेली घटना अशी की, येथील वासोळ रस्त्यावर श्रीराम मंदिरा लगत असलेल्या अंगणवाडीत शिक्षण व पोषण आहार घेण्यासाठी सकाळी रोजच्या प्रमाणे २५ ते ३० बालके सकाळी हजर झाले होते. त्याच बरोबर अंगणवाडी सेविका सविता शेवाळे व मदतनीस अर्चना वाघ  हया आपल्या कामावर हजर झाल्या होत्या. दररोज प्रमाणे आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान शाळेतील उपस्थित बालकांसाठी पोषण आहार शिजवत असतानाच अचानक गॅस सिलेंडर ने स्फोट घेतल्याने आगीचा भडका उडाला आगीने रौद्ररूप धारण करण्या पूर्वीच अंगणवाडीत उपस्थित असलेल्या लहान बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामुळे जीवित हानी टळली आहे.येथील सामाजिक कार्यकर्तेनी सदर अंगणवाडी शेजारील डॉ. सुभाष आहेर व डॉ. स्वप्नील सुर्यवंशी यांच्या दवाखान्यातील अग्निशमन सिलेंडर व पाणी  मागवून सदर आग विझविण्यासाठी सरपंच रतीलाल परदेशी, आनंद महाजन, नागेश निकम, समाधान महाजन, सुभाष आहेर,ग्रामविकास अधिकारी यु. बी.खैरनार आदी व ग्रामस्थ व पादचारी यांनी शर्थीचे प्रयत्न केले. व आग आटोक्यात आणली.  यावेळी अंगणवाडीत सेविका  सविता शेवाळे, मदतनीस अर्चना वाघ यांचे सह तीन ते सहा वयोगटातील सुमारे २५ ते ३० लहान बालके, तसेच दोन गरोदर माता व दोन लहान बालकांच्या माताही हजर होत्या.मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी ही याच अंगणवाडीत दुसऱ्यादा गॅसचा स्फोट घडल्याने शंका व्यक्त केली जात असून उलटसुलट चर्चा सुरू आहे.. याबाबत सरपंच रतीलाल परदेशी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक, पर्यवेक्षक के.एस. चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून तातडीने सर्व अंगणवाडी सेविकांची बैठक घेऊन खबरदारी घेत योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
लोहोणेर येथील अंगणवाडी गॅस नळीच्या लिकेज मुळे आगीचा भडका उडाला असल्याचा हा प्रकार दुसऱ्यादा घडला आहे.याबाबत सविस्तर माहिती घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करून या प्रकरणी कोणी दोषी आढळल्यास  दोषींवर  योग्य ती कारवाई करण्यात येईल
– जयश्री नाईक, सी.डी.पी.ओ.  पंचायत समिती देवळा
लोहोणेर येथील श्रीराम मंदिरा लगत असलेल्या अंगणवाडीत गॅस सिलेंडरचा  स्फोट होऊन आगीचा भडका उडण्याची ही दुसरी घटना आहे. याबाबत गॅस सिलेंडरची नळी लिक झाली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत संबंधित अधिकारी मार्फत  योग्यती चौकशी करण्यात येणार असून गावातील सर्व अंगणवाडी ना सुरक्षेच्या दृष्टीने नवीन अद्यावत गॅस शेगडी ग्रामपंचायतिच्या वतीने देण्यात येणार आहे.  शासनाने अंगणवाडीत पोषण आहार  शिजवण्यासाठी स्वतंत्र पर्यायी  व्यवस्था करण्यात यावी.
रतीलाल परदेशी, सरपंच ग्रामपंचायत लोहोणेर
Bhagwat Udavant

Recent Posts

कसबेसुकेनेत बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…

4 hours ago

सातपूरला ज्योती स्ट्रक्चर कंपनीला आग

सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या  आगीचे कारण…

23 hours ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…

2 days ago

जीएम साहेब येता दारी तोच दिवाळी दसरा

मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…

2 days ago

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम !

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…

2 days ago

पारा ५.७ अंशांवर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर!

पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड :  प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…

4 days ago