नवी दिल्ली :
इलेक्ट्रिक वाहनांना (इव्ही) आगी लागण्याच्या घटनांमुळे वाहन उद्योगाच्या या नवीन विभागाची गती मंदावली आहे. एप्रिलमध्ये ईव्हीच्या विक्रीत घट झाली. मार्चमध्ये 77,244 ईव्हीची विक्री झाली, जी एप्रिलमध्ये 72,536 हजारांवर आली. दर महिन्याला विक्री वाढण्याऐवजी घटण्याची ही गेल्या वर्षभरातली दुसरी वेळ आहे.
पेट्रोलच्या उच्च किमतींमुळे देशातील ईव्हीची (प्रामुख्याने दुचाकी) विक्री मासिक आधारावर 25 ते 35 टक्क्यांनी विक्रमी वाढली आहे. व्हेइकल डॅशबोर्ड या अधिकृत वेबसाइटनुसार, मे 2021 मध्ये देशात 3,311 ईव्ही विकल्या गेल्या, ज्याने डिसेंबर 2021 पर्यंत 50 हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर जानेवारीत विक्रीत थोडीशी घट झाली. फेब्रुवारीपासून, विक्री पुन्हा वाढू लागली आणि मार्चमध्ये ती विक्रमी 77,244 वर पोहोचली. मार्च महिन्याच्या अखेरीपासून ईव्ही दुचाकींना आगी लागणार्या घटना समोर येऊ लागल्या, त्यात अर्धा डझन लोकांना आपला जीव गमवावा लागला. ओला, प्युअर इव्हीआणि ओकिनाव्हा सारख्या अनेक कंपन्यांना त्यांच्या इव्ही परत मागवाव्या लागल्या. सरकारने नवीन ईव्ही स्कूटर लॉंच करण्यावर बंदी घातली असल्याचेही वृत्त आहे. या सर्व प्रकारामुळे खरेदीदारांच्या भावनेवर परिणाम होऊन एप्रिलमधील विक्री मार्चच्या तुलनेत साडेचार हजारांनी घटली.या सर्व प्रकारामुळे खरेदीदारांच्या भावनेवर परिणाम झाला आणि मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये विक्री साडेचार हजारांपेक्षा जास्त घसरून 77,244 वर आली. ईव्ही पायाभूत सुविधा विकसित करणार्या ईव्ही ऊर्जा या कंपनीचे सीईओ संयोग तिवारी म्हणाले की आगीच्या घटनांनंतर इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल कमी झाली आहे.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…