नाशिकच्या आनंदीचा ’भरतनाट्यम्’मध्ये डंका
नाशिक : नागपूर येथील अखिल नटराजम् आंतरसांस्कृतिक संघातर्फे अहमदाबाद येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय नृत्यारंभ स्पर्धेत नाशिकच्या आनंदी मंगेश खैरनार हिने वैयक्तिक नृत्य प्रकारात तृतीय व समूह नृत्य प्रकारात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून आलेल्या युवती भरतनाट्यम् सादर करतांना अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये नाशकातील आनंदी खैरनार हिने अहमदाबाद येथे दि. 22 ते 25 दरम्यान आयोजित अटीतटीच्या स्पर्धेत उत्कृष्ट नृत्य सादर करत स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, पदक घेऊन यश संपादन केले. जिल्हा माहिती अधिकारी अर्चना देशमुख व औरंगाबाद येथील जलसंपदा विभागाचे सहाय्यक मुख्य अभियंता मंगेश खैरनार यांची कन्या आहे. आनंदीच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.