आरोग्य विद्यापीठ रौप्य महोत्सवानिम्मित
पोस्टल तिकिट डिझाईन स्पर्धा
नाशिकः – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय डाक विभागामार्फत विद्यापीठाचे सानुकुलित टिकिट (Customized My Stamp), विशेष आवरण ( Special Cover) व विशेष रद्दीकरण ( Special Cancellation) यांची डिझाईन करण्याकरीता विद्यापीठातर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विद्यापीठाकडे डिझाईन सादर करण्याची अंतीम मुदत दि. 08 जानेवारी 2023 आहे.
याबाबत विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या स्थापनेस जून महिन्यात पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरीता विद्यापीठातर्फे पोस्टल तिकिट डिझाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा राज्यातील सर्व विद्यापीठातील सर्व विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. सहभागी स्पर्धेकांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले.
याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठातर्फे आयोजित सानुकुलित टिकिट (Customized My Stamp), विशेष आवरण ( Special Cover) व विशेष रद्दीकरण ( Special Cancellation) यांची रचना स्पर्धेतील अंतीम विजेत्यास रक्कम रु. 11,000/- बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धेकाने विहित नमुन्यातील अर्ज भरुन देणे अनिवार्य आहे. स्पर्धेबाबतची अधिक माहिती विद्यापीठाचे पुणे विभागीय कार्यालयाकडून 9405300605 या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक 020 – 29704023 आणि 29704024 या क्रमांकावर मिळेल.सहभागी स्पर्धेक जास्तीत जास्त दोन रचना (Designs) सादर करु शकतात. स्पर्धकांनी तयार केलेल्या डिझाईन कोरल, सीडीआर, पीडीएफ, जेपीइजी प्रकारात सॉफ्टकॉपीसह harshal.more@muhs.ac.in या ई-मेल पत्त्यावर विद्यापीठाकडे पाठवाव्यात. विशेष आवरण रचनेत कागदाच्या एकूण आकाराच्या पन्नास टक्के भाग रचनेने व्यापलेला असावा. स्पर्धेकरीता विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेले नियम, अटी व शर्तीचे स्पर्धेकांना काटेकोर पालन करावे. स्पर्धेसाठी परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील. निकाल प्रक्रियेनंतर अंतीम विजेत्याचे नावं विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
विद्यापीठातर्फे आयोजित सानुकुलित टिकिट (Customized My Stamp), विशेष आवरण ( Special Cover) व विशेष रद्दीकरण ( Special Cancellation) यांची रचना विद्यापीठाकडे जमा करण्याची अंतीम मुदत दि. 08 जानेवारी 2023 आहे. सदर स्पर्धेबाबत महाविद्यालय प्रमुखांनी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी जेणेकरुन मोठया प्रमाणात विद्यार्थी स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…