गुटखा माफीया राज भाटियाचा नाशिक मधील हस्तक तुषार जगताप अटकेत
– नाशिकसह राज्यातील गुटखा तस्करीत सहभाग
नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
नाशिक ग्रामीण पोलिसांचे गुटखा विरोधी अभियानाला मोठे यश मिळाले आहे. हरियाणातील आंतरराज्यीय टोळीचा सूत्रधार राज भाटिया याचे अवैध गुटख्याचे नेटवर्क महाराष्ट्रात पसरविणारा हस्तक म्हणून कथित समाजसेवक तुषार कैलास जगताप (वय ३६, रा. त्रिमुर्ती नगर, म्हसरूळ) यास घोटी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांसह विविध शासकीय विभागात तोरा मिरवणाऱ्या तुषार जगताप याच्या अटकेने तथाकथित समाज सेवकाचा बुरखा फाटला आहे.
या बाबतचे अधिक वृत्त असे की, इगतपुरी पोलीस ठाणेकडील पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर मुंबई बाजूकडे जाणारे गुटख्याने भरलेले दोन कंटेनर पकडून सुमारे सव्वा कोटींचा अवैध गुटखा जप्त केल्याप्रकरणी दोघांना अटक करून गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणी आंतरराज्यीय टोळीचा मुख्य सूत्रधार राज किशनकुमार भाटिया (वय ३८) यास जयपूर (राजस्थान) यास २३ जून रोजी पकडण्यात आले होते. भाटिया याच्या अटकेनंतर या साखळीची उकल होण्यास सुरूवात झाली. राज भाटिया हा दिल्ली व जयपूर येथून सुत्रे हलवून बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवून देशातील विविध राज्यांमध्ये गुटख्याची मोठया प्रमाणावर तस्करी करत होता. नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील गुटखा तस्करीचे दाखल गुन्हयांमध्ये मागील ०२ ते ०३ वर्षांपासून आरोपी राज भाटीया हा फरार होता. या गुन्हयांच्या तपासादरम्यान आरोपी राज भाटिया याने कबुली दिली की, तो सन २०२१ पासून नाशिक येथील तुषार जगताप याच्या संपर्कात होता व त्याच्या मदतीने महाराष्ट्रातील अवैध गुटख्याचे नेटवर्क चालवत होता. तुषार जगताप हा त्याच्या गुटखा तस्करीमधील परराज्यातील साथीदारांसह नेटवर्क चालवून नाशिक जिल्हयात गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी करत होता. तुषार जगताप याच्या अटकेमुळे गुटखा तस्करीची राज्यातील पाळेमुळे खोदण्यास पोलीसांना मदत होणार आहे. इगतपुरी पोलीस ठाणेकडील गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू सुर्वे हे करत आहेत. दरम्यान तुषार जगताप याला जामीन मंजूर झाल्याचे समजते.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…