आरोग्य सेवक एसीबीच्या जाळ्यात

लासलगाव :  प्रतिनिधी

पत्नीच्या संतती नियमनाचे ऑपरेशन करण्यासाठी लासलगाव प्राथमिक केंद्र २ मध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य सेवकाने तक्रारदार पतिकडे एक हजार रुपयांची लाच मागितली होती.बुधवार दि १४ रोजी नाशिकच्या लाचलूपचपत प्रतिबंधक विभागा च्या कारवाईत एक हजार रुपयांची लाच घेतांना या आरोग्य सेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली.गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील लाचेच्या प्रकरणांत वाढ झाली आहे.दर आठवड्यात लाचेचे प्रकरण उघडकीस येत आहेत.त्यातच लासलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र २ या विभागातील आरोग्य सेवकास एक हजार रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

बळीराम दत्तात्रय शेंडगे असे लाच घेणाऱ्या आरोग्य सेवकाचे नाव आहे.शेंडगे हे लासलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र २ या विभागातील आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी तक्रारदार यांच्या पत्नीची संतती नियमन शस्त्रक्रिया हि उप जिल्हा रुग्णालय,निफाड येथे करून दिल्याच्या मोबदल्यात सोमवारी एक हजार रुपयांची मागणी केली होती त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून सदर प्रकार कळवला.बुधवारी या विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप घुगे,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.नाशिक,साधना बेळगांवकर,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.नाशिक पोलिस हवालदार एकनाथ बाविस्कर,प्रफुल्ल माळी,विनोद पवार यांच्या पथकाने लासलगाव येथे सापळा रचला असता नियोजनानुसार शेंडगे यास एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.याबाबत त्यांच्याविरुद्ध लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *