अभिनय क्षेत्रात करिअर करायचे असल्यास जिद्द चिकाटी बरोबरच सहनशिलताही असावी लागते असे तु अशीच जवळी राहा.., गुम है किसीके प्यार मे आणि दृश्यम 2 चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवलेला नाशिककर अभिनेता सिध्दार्थ बोडके यांनी दैनिक गांवकरीशी बोलताना व्यक्त केले.
मूळ गाव कोणते आणि शिक्षण कुठे झाले? मी मुळ नाशिककर आहे.माझा जन्म सिन्नरला झाला. डे केअर शाळेत प्राथमिक शिक्षण झाले.तर आकारावी बारावी बी वायकेला झाली.त्यानंतरचशिक्षण एनबीटी लॉ कॉलेजला झाले.
अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरूवात कशी झाली?
बालनाट्यासून अभिनयालासुरूवात झाली आहे. जिजाई थियटरचे व्यावसायिक शामची आई हे नाटक केले होते.या नाटकाचे 500 प्रयोग झाले.सिध्दार्थ अहिरे हे माझे पहिले गुरू आहेत. त्यानंतरमी प्रायोगिक नाटकामध्ये काम करायला सुरूवात केली. एकांकिका स्पर्धेत काम केले. अश्वमेध थियटर्ससच्या माध्यमातून अनेक एकांकिका नाटक केले. रेनमेकअर नावाची एकांकिका केली.त्यानंतर खर्या अर्थाने अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरूवात झाली.
आतापर्यंतचा अभिनय क्षेत्रातील प्रवास कसा होता ?
दोन मराठी चित्रपटात काम केले. कन्यादान या झी मराठीवरील मालिकेत छोटी भूमिका साकारली. त्यानंतर मला तु अशीच जवळी राहा ही झी युवा वाहिनीवरील मालिका मिळाली. या मालिकेच्या माध्यामातून लोकप्रियता मिळाली.या मालिकेनंतर स्टार प्लसवर सध्या सुरू असलेली गुम है किसीके प्यार मै या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि दृश्यम 2 हा सिनेमा. पहिल्याच बॉलिवुड सिनेमा त्यात दिग्जासोबत स्क्रिन शेअर करायला मिळण माझ्यासाठी अ्रविस्मरणीय आहे. तसेच मी युट्युबवर चॅनलवर ,ऍमेझॉनवरही दोन मिनी सिरीज केल्या.
दृश्यमची -2 मधील भूमिकेविषयी ?
दृश्यममधील भूमिका खूप छान आहे. कथेला पुढे नेणारे माझे पात्र असल्याने भूमिका छोटी असली तरी लक्षात राहते. अजय देवगण, अक्षय खन्ना, तब्बू यांच्या सोबत स्क्रिन शेअर करायला मिळाली या गोष्टीचा खुप आनंद आहे.
अविस्मरणिय भूमिका कोणती?
प्रत्येक भूमिका जवळची आहे. जी भूमिका माझ्यातल्या अभिनयाला आव्हान देते अशी भूमिका करायला मला आवडते. मी साकारलेल्या सगळ्याच भूमिका मला आवडतात. मला बायोपिक करायला आवडेल. कॅरेक्टर रोल करायला आवडत. ऍक्टींग माझे पॅशन आहे. त्यामुळे माझ्या वाट्याला येईल ती भूमिका मी साकारतो.
अभिनय क्षेत्रात नसतात तर ?
अभिनय क्षेत्रात नसतो कदाचित वकिल झालो असतो. मी लॉ च शिक्षण घेतल आहे.
कोणते नवीन प्रोजेक्ट येणार आहेत?
गुम है किसीके प्यार में सिरीयल सुरू आहे. येत्या काळात प्रेक्षकांना नवीन भूमिकेत दिसेल.
–मुलाखत: अश्विनी पांडे