अभोण्यात कांदा आवक घटली

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्‍यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार क्विंटल कांदा आणला होता. त्यात दर 200 रूपयांनी घसरले होते. शनिवारी कांदा आवक 7 हजार क्विंटलने घटली, 300 ट्रँक्टरमधून 8 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यात 50 रूपयांची दर वाढ झाल्याचे दिसून आले.
शनिवारच्या उप बाजारात कांद्याला सरासरी 1400 ते 1500 रूपये दर मिळाला. गुरूवारी सरासरी 1200 ते 1450 रूपये दर मिळाला होता. त्यात 50 रूपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. यावेळी कांदा दर कमीत कमी 1200, गोल्टी गोलटा 450 ते 1275, खाद 700 ते 900 रूपये प्रति क्विंटलने विकला
गेला.
अभोणा व परिसरात बुधवारी पाऊस पडला होता, आता दुपारी कडक ऊन सायंकाळी पावसाळी वातावरण असा खेळ सुरू असल्याने ज्यांचा कांदा जमिनीत आहे, त्यांची चिंता वाढली आहे. शेती कामांसाठी पैशांची गरज असल्याने ताजा उन्हाळ कांदा विक्रीसाठी आणावा लागतो. भाववाढीची अपेक्षा असल्याने कांदा चाळींमध्ये साठवणूकीस प्राधान्य दिल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *