कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार क्विंटल कांदा आणला होता. त्यात दर 200 रूपयांनी घसरले होते. शनिवारी कांदा आवक 7 हजार क्विंटलने घटली, 300 ट्रँक्टरमधून 8 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यात 50 रूपयांची दर वाढ झाल्याचे दिसून आले.
शनिवारच्या उप बाजारात कांद्याला सरासरी 1400 ते 1500 रूपये दर मिळाला. गुरूवारी सरासरी 1200 ते 1450 रूपये दर मिळाला होता. त्यात 50 रूपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. यावेळी कांदा दर कमीत कमी 1200, गोल्टी गोलटा 450 ते 1275, खाद 700 ते 900 रूपये प्रति क्विंटलने विकला
गेला.
अभोणा व परिसरात बुधवारी पाऊस पडला होता, आता दुपारी कडक ऊन सायंकाळी पावसाळी वातावरण असा खेळ सुरू असल्याने ज्यांचा कांदा जमिनीत आहे, त्यांची चिंता वाढली आहे. शेती कामांसाठी पैशांची गरज असल्याने ताजा उन्हाळ कांदा विक्रीसाठी आणावा लागतो. भाववाढीची अपेक्षा असल्याने कांदा चाळींमध्ये साठवणूकीस प्राधान्य दिल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…