फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या
त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक
सिडको : विशेष प्रतिनिधी
सातपूर पोलीस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका बिअर बार मध्ये केलेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि लोंढे टोळीचा सर्वेसर्वा भुषण प्रकाश लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्यासह साथीदारास पोलिसांनी अटक केली आहे.
भूषण लोंढे विरोधात भारतीय न्याय संहिता, फौजदारी सुधारणा कायदा, हत्यारे कायदा, मपोका आणि मोक्का या विविध कलमांखाली त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सातपूर येथील गोळीबार प्रकरणात भूषण लोंढे याच्यावर गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून तो फरार होता.