नाशिक : वार्ताहर
एका 32 वर्षीय महिलेने नववी शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिला मूळची नाशिकची असल्याची माहिती मिळते आहे.
पीडित अल्पवयीन मुलगा कुटुंबासोबत कल्याणमध्ये राहतो. येथील एका इंग्रजी माध्यमातील शाळेत तो नववीच्या वर्गात शिकत आहे. संशयित महिला ही नाशिकात राहत होती. तिला दोन मुलं देखील आहेत . संशयित महिला पतीपासून वेगळी राहते. याच महिलेच्या जवळ पीडित मुलाची आत्या राहते. या दोघींमध्ये मैत्री होती. पीडित मुलाची आत्या जेव्हा- कल्याणला यायची तेव्हा-तेव्हा ती तिच्यासोबत आरोपी महिलेला देखील घेऊन यायची. ज्यामुळे पीडित मुलगा व अल्पवयीन मुलाची ओळख झाली होती.
अल्पवयीन मुलगा नाशिकला त्यांच्या आत्याच्या घरी जायचा. महिलेने अल्पवयीन मुलाला आपल्या जाळ्यात ओढलं. मुलाशी असलेल्या परिचयाचा तिने गैरफायदा उचलला. यावेळी महिलेने मुलाला विविध आमिषं दाखवून त्यांच्याशी जवळीक साधली.
एके दिवशी महिलेने मुलाला आपल्या घरात बोलवत जबरदस्तीने दारू पाजली. मुलाला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून . तिने मुलासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी महिलेने निर्वस्र अवस्थेत मुलासोबतचा व्हिडीओ देखील शूट केला.
फोनवरुन महिलेशी तासनतास गप्पा मारू लागला. या सगळ्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होऊ लागल्याने त्याच्या आईला त्याच्या वागण्याबाबत शंका निर्माण झाली.
मुलाच्या कुटुंबीयांनी भिवंडी शहरातील एका बालसुधार गृहात भरती करत. त्यांचं समुपदेशन करण्यात आलं. कोळसेवाडी पोलिसात या घटनेची तक्रार नोंदविण्यात आली. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी महिलेविरोधात बाल लैंगिक शोषण अधिनियमच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. संबंधित महिलेला अटक करण्यात आली. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या निकिता भोईगड प्रकरणाचा तपास करत आहेत.