सहा लाखांची लाच मागणारे
सहकार विभागाचे दोघे जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
सहा लाखांची लाच मागणार्या सहकार विभागातील अधिकार्यासह लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी काल अटक केली. भिमराव यशवंत जाधव, सहकार अधिकारी आणि अनिल नथुजी घरडे, वरिष्ठ लिपिक अशी या दोघा लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार हे को.ऑप क्रेडिट सोसायटीचे क्लार्क असून, सोसायटीच्या नियमानुसार सभासद यांनी कर्ज भरले नाही म्हणून सभासदांच्या घर लिलाव विक्रीचा आदेशाविरुद्ध विभागीय सहनिबंधक कार्यालय,नाशिक येथे सभासद यांनी रिव्हिजन दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी या कार्यालयात
सुरू होती. या कार्यवाहीची निकाल तक्रारदार यांच्या को- ऑप क्रेडिट सोसायटीच्या बाजूने देण्यासाठी दोघांनी तक्रारदाराकडे 6 लाख रुपयाची मागणी केली तसेच दि.7/12/2023 व दि.8/12/2023 रोजीचा पडताळणी कारवाईत तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 5 लाख रुपये लाचेची मागणी केली म्हणून दोघांवरही मुंबई नाका पोलिस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक नीलिमा डोळस, पोलीस नाईक संदीप हांडगे, सुरेश चव्हाण, यांच्या पथकाने ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.