लाचखोर राजेंद्र ढेरिंगेच्या घरावर ‘एसीबी’ची धाड

नाशिक : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते व अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात एसीबीने छापा टाकला होता. मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला 35 हजारांची लाच घेताना ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले होते. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
मेडिकल दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई टाळण्यासाठी थेट अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातच लाच घेतल्याचा प्रकार झाल्याने विरोधकांकडून थेट झिरवाळ यांच्याच राजीनाम्याची मागणी होत आहे. मंत्र्यांचा खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून आपण लाच स्वीकारल्याचा दावा राजेंद्र ढेरिंगे याने केल्याचे सांगितले जात आहे.
या सगळ्या प्रकरणानंतर लाच घेणारा कर्मचारी राजेंद्र ढेरिंगे याच्या विरोधात केवळ चौकशीच नव्हे तर त्याची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देशही मंत्री झिरवाळ यांनी दिले आहेत. दरम्यान, लाचखोर राजेंद्र ढेरिंगे याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राजेंद्र ढेरिंगे याच्या नाशिक येथील (नाशिकरोड) घराची झडती घेतली. या झडतीतून एसीबीच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय नवीन माहिती समोर येते हे पाहावे लागणार आहे.
राजेंद्र ढेरिंगे हे मूळ अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी आहे. दरम्यान, आता राजेंद्र ढेरिंगेच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून एसीबीच्या हाती जी कागदपत्रे लागली. ती कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली जाण्याची शक्यता आहे. या कागदपत्रांच्या माध्यमातून राजेंद्र ढेरिंगे याच्या लाचखोरीचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, याचा सुगावा लागणार का, हेही पाहावे लागेल

ACB raids bribe-taker Rajendra Dheringe’s house

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *