शेतजमीन मोजणीसाठी लाच घेताना
भूमिअभिलेखचा कर्मचारी जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
जमीन मोजणीसाठी तीन हजार रुपयांची लाचेची मागणी करुन पंधराशे रुपयांची लाच स्वीकारताना चांदवड येथील भूमिअभिलेख कार्यालयातील सहायक अंजीनाथ बाबुराव रसाळ या कर्मचार्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदाराची वडिलोपार्जित शेती असून, या शेतजमिनीची मोजणी करण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच मागीतली होती. पंधराशे रुपयांवर तडजोड करण्यात आली असता काल घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, हवालदार प्रफुल्ल माळी, सचिन गोसावी यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.