नाशिकरोड येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना जाळ्यात

नाशिकरोड येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना जाळ्यात

नाशिक: प्रतिनिधी

‘तुझ्यावर कारवाई करीन’ अशी धमकी देत कॅफेचालकाकडून तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सहायक उपनिरीक्षक शंकर जनार्दन गोसावी (रा. टाकळी रोड) यास लाच घेताना पकडण्यात आले..
कॅफेचालकाने त्याच्या कॅफेत जोडप्यांना ‘आडोसा’ मिळावा यासाठी तशी तजवीज केली होती. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी गोसावी याने कॅफेचालकाची भेट घेत तुज्यावर कारवाई करेन असा दम देत त्याच्याकडून दरमहा २ ते ३ हजार रुपये लाच देण्याचा दबाव टाकला. दरम्यान, या प्रकाराला त्रस्त होऊन कॅफेचालकाने गोसावीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. विभागाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. संशयित गोसावी हा विशेष शाखेत कार्यरत असतानाही त्याने संबंध नसतानाही कॅफेचालकाकडे लाच मागितल्याचे उघड झाले. तसेच पथकाने त्यास बुधवारी (दि.६) २ हजार ५०० रुपये लाचेची मागणी करून ती स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. भद्रकाली पोलिस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *