नाशिक ; प्रतिनिधी
ग्राहक संरक्षण मंचातील दाेघांनी लाच घेतल्याने समाेर आल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली असून गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.
संशयित धीरज मनोहर पाटील (वय ४३) आणि सोमा गोविंद भोये (५७) अशी संशयितांची नावे आहेत. सिडकाेतील सावतानगरमधील एका सदनिकेत महिलेने २७ लाख रुपयांच्या फ्लॅटची बुकिंग केली. यानंतर महिलेने बांधकाम व्यावसायिकाला तीन लाख ७० हजार रुपये आगाऊ दिले. त्यावर बांधकाम व्यावसायिकाने एका फायनान्स कंपनीद्वारे महिलेच्या फ्लॅटवर कर्ज मंजूर केले. हे पैसे घेतल्यानंतरही महिलेला फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे महिलेने नाशिक जिल्हा ग्राहक मंचात दावा दाखल केला. त्यात संशयितांनी लगेचच सुनावणीचा अर्ज पुढे ढकलून देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेतली. एसीबी तपास करत आहे.