35 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात

35 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
विल्होळी पोलीस चौकी येथे जमा करून घेतलेला ट्रक सोडण्यासाठी ३५ हजार रुपयाची लाच प्रकरणात पोलिस हवालदार रविंद्र बाळासाहेब मल्ले व खासगी इसम तरुण मोहन तोडी यांच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये लाच लुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली आहे.
तक्रारदार यांचा विल्होळी पोलीस चौकी येथे जमा करून घेतलेला ट्रक सोडण्यासाठी पोलिस हवालदार रवींद्र  बाळासाहेब मल्ले याने एक लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीवरुन ला.प्र.वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा रचला असता रवींद्र बाळासाहेब मल्ले, पोलीस हवालदार (नेमणूक तालुका पो. ठाणे, नाशिक ग्रामिण) यांनी तक्रारदार यांचे कडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली व तडजोडअंती ७० हजार लाचेची मागणी करून पहिला हफ्ता ३५ हजार रुपये रक्कम खासगी इसम तरुण मोहन तोंडी, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. पंचवटी नाशिक यांचेकडे देण्यास सांगितले. ६ नोव्हेंबर रोजी तरुण मोहन तोंडी यांनी ३५ हजार रुपये लाचेची रक्कम ओम नागपुर ट्रान्सपोर्ट, हिरावाडी, नाशिक येथे स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले. त्यानंतर दोघांविरुध्द पंचवटी पोलीस ठाणे, येथे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

7 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

7 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

7 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

7 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

8 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

8 hours ago