नाशिक : प्रतिनिधी
निफाड येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकाऱ्यास तब्बल एक लाख रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली.
तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी निफाड येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी राजेश शंकर ढवळे यांनी दीड लाख रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागीतली होती. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी पडताळणी केल्यानंतर लाच मागीतल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर- घारगे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस नाईक दीपक पवार, संजय ठाकरे, अविनाश पवार यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली.