नाशिकरोडला लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक ताब्यात
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहर व जिल्हयात लाच मागण्याचे प्रमाण जोरात सुरु असून कुठेही लाचेचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही. आता नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस उप निरीक्षकाला 25 हजाराची लाच घेतल्याचे समोर आले आहे. पंचवीस हजारांची लाच घेताना संशयित उपनिरिक्षकाला लाचलूचपत पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. गणपत काकड असे या संशयिताचे नाव आहे. दरम्यान काकडचा कामापेक्षा पैसे वसुलीवरच लक्ष ठेवत असल्याची चर्चा नाशिकरोड परिसरात होत आहे. पोलीस ठाण्यात काही अडचणीचे कामे घेऊन येणार्यांना एकांतात भेटून त्यांच्याकडून आर्थिक घेवाण होत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान काकडला लाच घेताना ताब्यात घेतल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात खळ्बळ उडाली आहे.