पाच लाखांची लाच स्वीकारताना सहायक बीडीओ , विस्तार अधिकारीजाळ्यात

पाच लाखांची लाच स्वीकारताना सहायक बीडीओ जाळ्यात
नाशिक: पाच लाखांची लाच स्वीकारताना जळगाव येथील सहायक गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी जाळ्यात अडकल्याची घटना आज जळगाव मध्ये उघडकीस आली, रवींद्र शाळीग्राम सपकाळे असे सहायक गटविकास अधिकारी आणि पद्धमकर बुधा अहिरे असे विस्तार अधिकाऱ्यांचे नाव आहे,तक्रारदार हे जामनेर येथे कार्यरत असून त्यांची चौकशी सुरू असून, तक्रारदार यांच्या बाजूने सकारात्मक अहवाल देण्यासाठी दोन्ही अधिकारी यांनी पाच लाखांची लाच मागितली होती, ती स्वीकारतांना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे,एन एन जाधव, हवालदार सुरेश पाटील, सहायक फौजदारदिनेशसिंग पाटील, हवालदार घुगे, किशोर महाजन, प्रदीप पोळ , शैला धनगर, प्रणेश ठाकूर, पोलीस नाईक बाळू मराठे, सुनील वानखेडे, राकेश दुसाने यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *