नाशिक : प्रतिनिधी
घोटी येथील महावितरणच्या सहायक अभिंयत्यास चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. सचिन चव्हाण असे या लाचखोर सहायक अभियंत्याचे नाव आहे.
तक्रारदाराचा वॉटर फ्युरिफिकेशन प्लान्ट आहे. या प्लान्टवर असणार्या मीटरवर वाढीव वीज लोड मंजूर करुन देण्यासाठी सचिन चव्हाण यांनी चाळीस हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना सचिन चव्हाण यास पथकाने रंगेहाथ पकडले. उपअधीक्षक अभिषेक पाटील, सुखदेव मुरकुटे, प्रणय इंगळे यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…