महावितरणच्या दोघांना लाच घेताना पकडले

नाशिक : प्रतिनिधी
व्यावसायिक व घरगुती वीज मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच घेताना वाडिवर्‍हे येथील नागेश्‍वर रघुनाथ पेंढारकर आणि शुभम रामहरी जाधव अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहाथ पकडले. या दोघांनीही बारा हजार रुपयांची लाच मागीतली होती. मात्र, तडजोडीअंती सात हजार रुपये घेताना पकडले.
तक्रारदार यांचे वाडीवर्‍हे गावातील दोन व्यावसायिक आणि एक घरगुती वीज मीटर बसवून दिले होते. त्याची बक्षिसी म्हणून बारा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती सात हजार रुपये देण्याचे ठरले. यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला.  पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक अजय गरुड, प्रभाकर गवळी, शीतल सूर्यवंशी यांच्या पथकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अक्षीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

View Comments

  • नाशिक जिल्ह्याची ईभ्रत घालवली या लाच घेणारांनी

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago