नाशिक : प्रतिनिधी
जनावरांच्या गोठ्याचे प्रकरण मंजूर करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणार्या चांदवड पंचायत समितीच्या कंत्राटी सहायक कर्मचार्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. नारायण विश्वनाथ शिंदे असे या लाचखोर अधिकार्याचे नाव आहे.
तक्रारदाराच्या वडिलांनी चांदवड पंचायत समितीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतंर्गत जनावरांच्या गोठ्यासाठी शासकीय अनुदान मंजूर करुन देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी नारायण शिंदे यांनी केली होती.तडजोडी अंती चार हजार रुपये देण्याचे मान्य केले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने सापळा रचला होता. काल चार हजार रुपये स्वीकारताना शिंदे यांना पथकाने रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील, निरीक्षक अनिल बागूल, पोलीस नाईक राजेश गिते, शरद हेंबाडे, अजय गरुड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…