लाचखोर शाखा अधिकाऱ्यास इतकी शिक्षा, कोर्टाने ठोठावला तब्बल एवढा दंड

पाट बंधारे विभागाच्या
लाचखोर शाखा अधिकाऱ्यास 5 वर्षांची शिक्षा
नाशिक: प्रतिनिधी
पंधरा हजार रुपयांची लाच घेतलेल्या पाट बंधारे विभागाच्या शाखा अधिकाऱ्यास पाच वर्षांची सक्तमजुरी आणि दहा लाख रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली, लाच खोरीच्या प्रकरणात दोष सिद्ध होण्याचे प्रमाण अत्यल्प असताना या अधिकाऱ्यास झालेल्या शिक्षेमुळे लाचखोरी ला आळा बसण्यास मदत होण्याची आशा व्यक्त होत आहे.
शाखा अधिकारी राजू पुना रामोळे शाखा अधिकारी लघु पाटबंधारे उप विभाग सटाणा यांनी तक्रारदार यांच्याकडे जाखोडा धरणातून गाळ काढण्याच्या मोबदल्यात तसेच गाळ काढणे काम सुरू ठेवण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच2019 साली घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर सटाणा पोलीस ठाण्यात 53/2019 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम7अनव्य गुन्हा दाखल झाला होता, या खटल्याचे कामकाज मालेगावच्या अतिरिक्त सत्र न्यायलया समोर चालले, सरकारी अभियोक्ता बागले यांनी युक्तिवाद केला, अंतिम युक्तिवाद महेंद्र फुलपगारे व एस, के सोनवणे यांनी केले, पोलिसांनी केलेला तपास आणि साक्षीदार यांनी दिलेल्या जबाब मुळे गुन्हा सिद्ध झाल्याने 5 वर्षांची शिक्षा आणि 10 लाखाचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, साधना इंगळे, यांनी केला, न्यायलायत खटल्याचे कामकाज अंमलदार सचिन गोसावी, संदीप बत्तासे यांनी पाहिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *