पाटबंधारे विभागाची महिला अभियंता लाच घेताना जाळ्यात,मेरीच्या कार्यकारी महिला अभियंताही लाचखोरीत सहभागी

पाटबंधारे विभागाच्या दोन महिला
अभियंता लाच घेताना जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
पाटबंधारे विभागाच्या सहायक अभियंता आणि मेरीच्या कार्यकारी अभियंता महिलांनी एक लाख चाळीस हजारांची लाच मागीतली असता त्यापैकी  62 हजारांची लाच घेताना आज लाच लुचपत प्रतिबंधक विभाागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पाटबंधारे विभागाच्या प्रथम वर्ग सहायक अभियंता श्रीमती रुबिया मोहम्मद हनिफ शेख आणि मेरीच्या कार्यकारी अभियंता श्रीमती रजनी पाटील, रा.603,हरी आमंत्रण, दत्त मंदिर रोड,नाशिक रोड अशा लाचखोर अधिकारी महिलांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या कार्यक्षेत्रातील उंबरे,ता.राहुरी येथील पूर्ण झालेल्या कामाचे देयक 7 लाख 75 हजार 963 रुपये अदा केले म्हणून  या कामाच्या अदा केलेल्या बिलापोटी श्रीमती शेख यांनी स्वतः साठी 8 टक्के प्रमाणे व रजनी पाटील यांच्यासाठी 10 टक्के असे  एकूण 18 टक्के प्रमाणे 1 लाख 39 हजार पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला असता 62 हजार रुपये लाच स्वीकारताना रुबिया शेख यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर श्रीमती रजनी पाटील यांनी लाच घेण्यास दुजोरा दिला म्हणून त्यांच्याविरुद्ध नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. सापळा अधिकारी उपअधीक्षक प्रवीण लोखंडे,हायक सापळा अधिकारी शरद गोर्डे, अंमलदार रवींद्र निमसे,बाबासाहेब कराड,किशोर लाडमहिला पोलीस अंमलदार  राधा खेमनर,सना सय्यद. पोलीस अंमलदार हरून शेख यांच्या पथकाने ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, माधव रेड्डी, नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *