लासलगाव समीर पठाण
लासलगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे लाईन कोटमगाव शिवारात सोमवारी पहाटे ५.४४ वाजेच्या दरम्यान
टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने निफाड कडे जात असताना पोल नंबर १५ ते १७ मधी ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू असताना चार मेंटेनन्स कर्मचाऱ्यांना रेल्वे लाईनचे मेंटनेस करणाऱ्या टॅावरने धडक दिल्याने या कर्मचाऱ्यांना जबर मार लागल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
संतोष भाऊराव केदारे (वय 38), दिनेश सहादु दराडे (वय 35), कृष्णा आत्मराम अहिरे (वय 40), संतोष सुखदेव शिरसाठ (वय 38) अशी मयत झालेल्या चौघांची नावे आहेत.स्थानिक कार्यकर्त्यांनी या चौघांना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्नील पाटील यांनी तपासणी करून या चारही रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेनंतर चारही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी जोरदार आक्रोश केला.घटना समजतात लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ,पोलीस उप उपनिरीक्षक गवळी,पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठुळे,लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती सुवर्णा जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…
प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्या…
अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…
मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…
व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्याचे वर्गीकरण करण्यात अपयश…
पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…