मालेगाव: प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील व-हाणे गावाजवळ मनमाड रस्त्यावर मंगळवारी (दि.२७) ट्रकच्या तिहेरी विचित्र अपघात घडला. या अपघात ४ जण जखमी झालेत. दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. मनमाडहुन मालेगावच्या दिशेने येणारा ट्रकला दुसरा ट्रॅक ओव्हरटेक करीत असताना समोर देखील भरधाव वेगाने तिसरा ट्रॅक आल्याने तिघेही वाहने एकमेकांवर धडकून अपघात घडला
या तिहेरी अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक रस्त्यावरून दूर केले. चार जखमींना उपचारासाठी मालेगावात दाखल करण्यात आले होते. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.