सातपूर: प्रतिनिधी
ट्रीपल सीट मोटारसायकल झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना एबीबी सर्कलनजीक घडली.
याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याचे हवालदार विजय खैराते यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की विशाल संजय मराठे (वय २०, रा. मु. पो. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) हा एमएच १५ जीपी ६२०४ या क्रमांकाची मोटारसायकलवरून काल एबीबी सर्कलकडून सिटी सेंटर मॉलकडे ट्रीपल सीट जात होता. ही भरधाव मोटारसायकल लक्षिका लॉन्सच्या समोर दुभाजकाजवळ असलेल्या झाडावर जाऊन आदळली.
या अपघातात दुचाकीचालक विशाल मराठे याच्यासह मागे बसलेला विष्णू प्रमोद जोशी (वय १८) हे दोघे जण ठार झाले, तर त्यांचा तिसरा साथीदार हर्षल रवींद्र शिरसाठ (वय २२, रा. श्रमिकनगर, सातपूर) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…