वणी प्रतिनिधी
वणी – पिंपळगाव रस्त्यावरील बोराळे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीसगाव ( ता. दिंडोरी ) येथील एकाच कुटुंबातील काका व दोन पुतणे असे तिघे जण ठार झाले. घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तीन कर्ते पुरुष मयत झाल्याने कराटे कुटुंबासह तीसगाव गावावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वणी ते पिंपळगाव बसवंत रस्त्यावरील बोराळे फाटा येथे वणीकडून पिंपळगाव बसवंत कडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने तीसगावकडून वणीकडे येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील निवृत्ती सखाराम कराटे ( वय ५५ ), केदु यशवंत कराटे ( वय ३५ ) व संतोष विष्णु कराटे ( वय ३३ ) सर्व रा. तीसगाव ता. दिंडोरी हे मयत झाले. तिन्ही इसम वणी येथे आठवडे बाजारासाठी येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वणी रुग्णालायात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासुन मृत घोषीत केले. रात्री उशीरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला असुन पलायन करणाऱ्या अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहे. याबाबत अधिक तपास वणी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहे.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…