नाशिक

अंकाई शिवारात ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

येवला प्रतिनिधी
तालुक्यातील अंकाई शिवारात येवला-मनमाड राज्यमहामार्गावर दुचाकी आणि ट्रक यांच्या अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले आहेत. याबाबत तालुका पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास येवला-मनमाड महामार्गावर ट्रक व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. येवला बाजूने मनमाड दिशेला जात असलेला ट्रक (क्रमांक आरजे 09 जीबी 3518) आणि येवल्याच्या दिशेला येत असलेली मोटारसायकल (क्रमांक एमएच 15 सीएच 1240) यांच्यात अपघात झाला. ट्रकची धडक इतकी जोरात होती की, दुचाकीचे प्रचंड नुकसान होऊन दोघांचा मृत्यू झाला. अद्याप दोन्ही मृतांची ओळख पटली नसून, ओळख पटविण्याचे आव्हान येवला तालुका पोलिसांपुढे आहे. कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांसोबत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती स्थानिक समाजसेवक अल्केश कासलीवाल, राजूसिंग परदेशी आदींना समजताच त्यांनी तातडीने सहकार्‍यांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. यावेळी दोन्ही मृतदेह खासगी रुग्णवाहिकांद्वारे उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले असून, ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून, रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते

Bhagwat Udavant

Recent Posts

बांगड्या पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया पोलिसाला जमावाने बदडले

सटाणा:  प्रतिनिधी शहरात महिलेवर चाकु हल्ला झाला आहे. आम्ही पोलिस असून तुम्ही कुठे चाललात हातातल्या…

15 hours ago

लढाऊ वैमानिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलची पासिंगआउट परेड दिमाखात नाशिक ः प्रतिनिधी जहाँ डाल डाल पे…

18 hours ago

मॉन्सून दोन दिवसांत केरळात दाखल

राज्यात सात दिवसांत दाखल नवी दिल्ली ः महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पावसाने थैमान घातले असताना अरबी समुद्रात…

19 hours ago

56 तासांनंतर जिंदाल आग आग आटोक्यात

इगतपुरी : प्रतिनिधी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला तीन दिवसांपूर्वी लागलेली आग अखेर 56…

19 hours ago

खरीप हंगामासाठी पैसे नसल्याने बळीराजा हतबल

यांत्रिकीकरणामुळे मशागत खर्चात वाढ, सोसायटीतून कर्जपुरवठा करावा अस्वली स्टेशन : प्रतिनिधी भाताचे आगार समजल्या जाणार्‍या…

19 hours ago

ठाणगावात चोरी करणारा चोरटा गजाआड

सिन्नर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सिन्नर ः प्रतिनिधी तालुक्यातील ठाणगाव येथे घराच्या बंद दरवाजाची कडी उघडून…

20 hours ago