पुलावरून कार कोसळून 3 जण ठार, नांदगाव जवळील घटना, मृतांत बालिकेचा समावेश

नांदगाव(आमिन शेख) :

नांदगाव -मालेगाव मार्गांवर नाग्या – साक्या धरणाच्या पुलावरून कार कोसळून एका लहान बालिकेसह 3 जण ठार तर 7 जण जखमी झाल्याची घटना घडली,

घटनेची माहिती मिळताच नांदगाव येथून पोलिस व सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले सुरू

सर्व जखमीना नांदगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले  असून  काहींची प्रकृती गंभीर आहेत,

नांदगाव -मालेगाव मार्गांवर नाग्या – साक्या धरणाच्या पुलावरून कार कोसळून झालेल्या भीषण अपघातात एका लहान बालिकेसह 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 7 जण गंभीर जखमी झाले आहे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहीचीं प्रकृती गंभीर आहे सर्व जण मालेगाव येथील असून जालन्याला लग्न सोहळ्यासाठी गेले होते लग्न सोहळा आटोपून मालेगावकडे परतत जात असताना मध्य रात्री नंतर हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीना हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे,

– लग्नानंतर परतत असताना झाला अपघात….!
अपघात झालेले सगळे लोक मालेगाव येथील असुन ते एका लग्नाला जालण्याला गेले होते लग्न सोहळा आटोपून घरी जात असताना रात्री उशिरा हा अपघात झाला यात लहान मुलीसह तीनजणांना आपले प्राण गमवावे लागले आहे याठिकाणी कायम अपघात होत असतात या ठिकाणी लाईट लावण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे.

पाहा व्हीडिओ

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago