समृद्धी महामार्गावर  अपघात; चार ठार

समृद्धी महामार्गावर  अपघात; चार ठार
सिन्नर प्रतिनिधी
राज्यात सर्वात मोठा महामार्ग असलेल्या समृद्धी महामार्गावर नेहमीच अपघाताची मालिका सुरु असून आता पुन्ह्या एकदा मुंबईहून समृद्धी महामार्गाने शिर्डीला परतत असताना भरधाव कार दुभाजकाला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत   दि ११ रविवारी रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास सिन्नरच्या हद्दीत ही घटना घडली.
सिन्नरजवळील खंबाळे शिवारात झालेल्या या भीषण अपघातात शिर्डी येथील चौघेजण ठार झाले आहेत. त्यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हज यात्रेकरूंना सोडून हे सर्वजण शिर्डीला परतत होते. अपघातात चौघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. सिन्नर हद्दीतील हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर खंबाळे शिवारात घोटी बाजूकडून शिर्डी बाजूकडे जाणारी अति वेगात असलेल्या इन्होवा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळली. या अपघातात रज्जाक अहमद शेख (वय ५५), सत्तार शेखलाल शेख (वय ६५), सुलताना सत्तार शेख‌‌ (वय ५०) हे जागीच ठार झाले.‌ तर, फैयाज दगुभाई शेख (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुबेर रज्जाक शेख (वय ३५), मैरूनिसा रज्जाक शेख (वय ४५), अझर बालन शेख (वय २५) मुस्कान अजहर शेख (वय २२) हे गंभीर जखमी झाले. यातील काही जखमी शिर्डी येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल तर काही नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहेत. मयत आणि जखमी सर्व शिर्डी येथील रहिवासी असून एकमेकांचे नातलग आहेत.
पोलिस उपअधीक्षक प्रदीप मौराळे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलिस सिन्नर केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी, महाराष्ट्र सुरक्षा पथक, जलद प्रतिसाद पथक समृध्दी महामार्ग यांनी जलद घटनास्थळी जात इनोव्हा कारचे दरवाजे कटरने कापून मयत आणि जखमींना कारमधून बाहेर काढले. मयतांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात तर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या साह्याने उपचारासाठी रवाना करण्यात आले. अपघात ग्रस्त वाहन घटनास्थळावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Bhagwat Udavant

Recent Posts

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

1 day ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

1 day ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

1 day ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

2 days ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

2 days ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

2 days ago