बालक जखमी, त्रंबकेश्वर रोडवरील घटनाव
सातपूर: प्रतिनिधी
सातपूर त्र्यंबकेश्वर रोड आय टी आय सिग्नल लगत असलेल्या उद्योग भवन समोर आज सकाळी ९ च्या सुमारास चालत्या रिक्षावर झाड पडून झालेल्या दुर्घटनेत रिक्षाचालकासह एका महीलेचा मृत्यू झाला, तर रिक्षामध्ये असलेला एक लहान मुलगा जखमी झाला,. मृत झालेल्या व्यक्तींचे रिक्षाचालक पोपट सोनवणे. व प्रवाशी शैला पटनी असे आहे,
जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डाँक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले. या घटनेमुळे पुन्हा एकदा धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नाशिक पंचवटी येथून गंगास्नान करून सातपूर रोडने रिक्षाचालक पोपट सोनवणे सकाळी नऊच्या सुमारास शैला पटनी लहान मुलाला घेऊन जात असतानाच गुलमोहर झाड रिक्षावर पडले. त्याखाली तिघेही दबले गेले. स्थानिकांनी धाव घेत त्यांना बाहेर काढले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सोनवणे व पटनी यांचा मृत्यू झाला . या झाडाबाबात अनेकदा पालिकेकडे नागरिकांनी तक्रारी केल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. या अघोदर अश्या घटना घडल्या आहेत.घटनास्थळी अग्नीशाम पथक व पोलिस दाखल झाले होते .
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…