चांदवड चौफुलीवर बस -कंटेनर अपघातात वाहक ठार, चार विद्यार्थी जखमी
चांदवड :-मुंबई -आग्रा महामार्गांवर चांदवड चौफुलीवर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात.. अपघातात कंडक्टरचा जागीच मृत्यू तर 4 कॉलेज विद्यार्थ्यासह काही प्रवासी जखमी.. जखमीना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की एसटीचा मागचा भाग पूर्ण कापला गेला. अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. क्रेन मागवण्यात आल्यानंतर एसटी दूर करण्यात आली, मागील आठवड्यातच चांदवडला अपघात होऊन चौघे ठार झाले होते.