शिरवाडे वणी फाट्याजवळ दुर्घटना
लासलगाव प्रतिनिधी
शिरवाडे(वणी)फाट्यावर मोटरसायकल आणि बसच्या भीषण अपघातात तीन शिवसैनिकांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान घडली.
या बाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार युवा सेना निफाड तालुका उपप्रमुख सुभाष माणिकराव निफाडे, निष्ठावंत शिवसैनिक महेश चंद्रकांत निफाडे,नितीन भास्करराव निफाडे यांचे काल सोमवार दि २६ जून २०२३ रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान शिरवाडे फाट्यावर बस आणि मोटरसायकलच्या झालेल्या भीषण अपघातात निधन झाले.या घटनेमुळे आज मंगळवारी शिरवाडे वणी गाव व शिरवाडे फाटा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दि २७ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता शिरवाडे (वणी) ता.निफाड येथे अंतीम संस्कार करण्यात येणार आहे.दरम्यान शिवसैनिकांचा अशाप्रकारे निधन झाल्याने निफाड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…