चिंचविहिर येथे दोन सोळा वर्षीय मुलींचा पाण्यात पडून मृत्यू तर एक जखमी
नांदगांव प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचविहीर तांडा येथील दोन सोळा वर्षीय मुलींचा चिंचवीर तांडा येथे असलेल्या के टी बंधाऱ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दिनांक ८ रोजी घडली
पूजा अशोक जाधव (वय १६ ) वर्ष तिची मैत्रीण खुशी देवा भालेकर ( १६ ) तसेच कावेरी देवा भालेकर ( १८ ) या तिघी कपडे धुण्यासाठी चिंचवीहीर तांड्याजवळ असलेल्या केटी बंधाऱ्यावर गेलेल्या असताना त्यांचा बंधाऱ्यातील पाण्यात पाय घसरून पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांना औषध उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ राठोड यांनी पूजा अशोक जाधव ( १६ ) तसेच खुशी देवा भालेकर (वय १६ ) चिंचविहिर तांडा यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले या घटनेची आकस्मित मृत्यूची नोंद नांदगाव पोलिसात दाखल करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय वाघमारे हे करत आहेत तर कावेरी देवा भालेकर वय ( वर्ष १८ ) हिला पुढील औषध उपचारा कामी मालेगाव येथे हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले आहे
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…