लासलगाव:समीर पठाण
भारतीय सैन्य दलात राजस्थान येथे सेवेत असलेले खडक माळेगाव चे सुपुत्र योगेश सुखदेव शिंदे यांचे शुक्रवारी अपघाती निधन झाले.आज शनिवारी खडक माळेगाव येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या बाबत मिळालेल्या माहितीनुसार योगेश सुखदेव शिंदे हे पोळा सणा निमित सुट्टी घेऊन खडक माळेगाव येथे घरी आले होते.पोळ्याचा सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ते काही कामानिमित्त मोटारसायकल वरून वनसगाव रस्त्यावरून जात असताना त्याच वेळी समोरून येणाऱ्या पीक अपगाडी व त्यांच्या मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक होऊन योगेश सुखदेव शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातानंतर रात्री त्यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी देवळाली कॅम्प येथील आर्मी सेंटर येथे पाठविण्यात आला होता.
देवळाली कॅम्प येथून योगेश सुखदेव शिंदे यांचे पार्थिव देह आज शनिवारी दुपारी खडक माळेगाव येथे आणल्यानंतर त्यांच्यावर दुपारी चार वाजता शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.योगेश सुखदेव शिंदे यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा,भाऊ,भावजई असा परिवार आहे.या घटनेमुळे परिसरात गावांमध्ये शोककळा पसरली आहे.