लातूर प्रतिनिधी
लातूर – उदगीर मार्गावरील लोहारा गावाजवळ भीषण अपघात झाला. एसटी बस आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील 10 प्रवासी जखमी झाले. ठार झालेले हे कारमधील प्रवासी आहेत. एका गंभीर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
उदगीर – नळेगावर रस्त्यावरील हैबतपूर पाटीजवळ हा भीषण अपघात झाला. कारमधील भाविक तुळजापूरच्या तुळजाभवानीचं दर्शन घेऊन माघारी परतत होते तर बस चाकूर कडे जात होती. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमींना रुग्णालयात हलवले.
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…