नाशिक

उद्योगमंत्र्याच्या निर्देशाने पांजरापोळचा गुंता सुटणार

आ.फरांदेंचा पुढाकार:गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला गोड बातमी
नाशिक- जिल्हाधिकारी,महापालिका आयुक्त व सहमुख्या कार्यकारी अधिकारी (एमआयडीसी) यांची संयुक्त समिती नेमून या पांजरा पोळ्च्या जागेची संपूर्ण चौकशी करावी.तसेच त्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल ताबडतोब द्यावा असे निर्देश देत झाडांच्या आणि गाईंच्या नावाखाली जर कुणी पांजरापोळची 2000 एकर जागा रोखून धरत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक केल्याने उद्योजकांच्या आशा उंचावल्या आहेत.नाशकात मोठ्या कंपन्यांच्या विस्ताराचा तसेच मोठे नवीन उद्योग येण्याचा मार्ग त्यामुळे खुला होणार होणार असल्याने उद्योजकांच्या गोटात आनंदाचे वातावरण असून त्यामुळे सर्वांचाच गुढीपाडवा गोड होणार आहे.
पंजरापोळच्या जागेचा गुंता सोडविण्यासाठी व नाशकात मोठे उद्योग येण्याचा मार्ग खुला व्हावा यासाठी नाशिक मध्यच्या आ.देवयानी फरांदे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात आयोजित बैठकीच्यावेळी ना.सामंत यांनी लोकप्रतिनिधी आणि उद्योजक यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या.यावेळी पांजरापोळची जागा उद्योगासाठी आरक्षित ठेवावी असा आग्रह आमदार तसेच निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्यासह उपस्थित सर्व उद्योजकांनी धरला असता ना.सामंत यांनी वरीलप्रमाणे निर्देश दिले.
आलोटे परशुराम या ठिकाणी फक्त पाच एकर जागेत 1000 गाईंचे पालन करणारी संस्था आहे.त्यानुसार त्यांना जागा देण्यास आमची हरकत नाही.तसेच कुठलीही झाडे तोडू नयेत.
नव्या उद्योगांसाठी तसेच उद्योग विस्तारासाठी नाशिकचा प्राधान्याने विचार करा असे आम्ही नवीन गुंतवणूकदारांना सांगत आहोत.जर्मनच्या काही कंपन्यांशी आमचे बोलणे चालू आहे. लवकरच नाशिककरांना आम्ही चांगली खुशखबर देणार आहोत असेही वक्तव्य यावेली उद्योगमंत्री सामंत यांनी केल्याने नाशिककारांच्यादृष्टीने हा सुखद धक्काच म्हणावा लागेल.
प्रास्ताविकात आ. देवयानी फरांदे यांनी नाशिककरांच्या मागण्या मांडल्यात. त्यानंतर झालेल्या चर्चेत निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, प्रदीप पेशकार,आशिष नहार, राजेंद्र अहिरे, गोविंद झा, श्रीकांत पाटील,राजेंद्र कोठावदे,सुधाकर देशमुख,निखिल तापडिया,कैलास पाटील, आदी उद्योजकांनी भाग घेतला व आपली भूमिका मांडली.
कुठलीही वृक्षतोड करण्यास आमचा पाठिंबा नाही.आम्हीसुद्धा वृक्षप्रेमीच आहोत.तसेच गोपालन करणे हेसुद्धा आम्ही आमचे परम कर्तव्य समजतो.परंतु आता ही जागा शहराच्या मध्यवस्तीत आल्यामुळे त्याच्या मोबदल्यात दुसरी ग्रामीण भागातील जागा त्यांना देण्यास आमची काहीही हरकत नाही.या ठिकाणी असलेले वृक्षवल्ली ही ओपन स्पेसमध्ये व राखीव जागेत रूपांतरीत करून त्याची कुठलीही वृक्षतोड न करावी असे मत निमाच्या व सर्व उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, उद्योग विभागाचे सहसचिव संजय देवगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पाटील, एमआयडीसीचे योगेश आहेर, नाशिकचे तहसीलदार नाशिक एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यासह अनेक अधिकारी वर्ग उपस्थित होते
होते

Ashvini Pande

Recent Posts

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

6 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

13 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

14 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

14 hours ago

‘सचेत’ अ‍ॅप देणार आपत्तीची माहिती

अ‍ॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…

14 hours ago

वडनेरला द्राक्ष उत्पादकाची पंधरा लाखांची फसवणूक

पिंपळगावच्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची तब्बल 15…

14 hours ago