ठाकरे यांच्या बंगल्यांचा हिशोब घेणारच

 

किरीट सोमय्या यांचा ईशारा

नाशिक : प्रतिनिधी

ठाकरे कुटुंबाने गायब केलेल्या बंगल्याचा हिशोब घेतल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, त्यांनी 19 बंगल्याचा हिशोब देणं आवश्यक आहे. पत्नीच्या नावाने ऍग्रिमेंट केलं, अर्ज केला. स्वतःच्या नावाने प्रॉपर्टी घेतली. मात्र इन्कम टॅक्सला दाखवलं नाही, त्यामुळे चोरी पकडली गेली, मग 19 बंगले गेले कुठे? असा सवाल किरीट सोमैय्या यांनी ठाकरे यांना केलाय.

नाशिकमध्ये अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था समाज सहाय्यक संस्था नाशिक यांच्या वतीने सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी किरीट सोमय्या उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा सोमय्या यांनी निशाणा साधला. कोरोना बाबत चौकशी करत असताना मुंबई पालिका आयुक्तांना भीती कसली वाटते. कोरोना काळातील ऑडिट करावेच लागणार आणि ऑडिट होणारच. संबंधितांनी परिवाराच्या नावाने कंपन्या काढल्या आणि कोविडमध्ये कमाई केली. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतः कॉर्पोरेट कंपनी बनवून कॉन्ट्रॅक्ट घेतलं. असा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला. संजय राऊत यांच्यावर बोलताना सोमय्या म्हणाले कि, 57 हजाराचे कागद संजय राऊत देऊ शकले नाही. 120 रुपयांचा कागद देऊ शकले नाही. या प्रकरणावरून हायकोर्टाने त्यांना तमाचा दिला. त्यावेळी बोगस एफआयआर दाखल करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले होते. सीमावाद प्रश्नी विरोधी पक्षाची अवस्था तशी झाली आहे. भाजप आणि राज्य सरकार एक इंच जागाही देणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची ज्यावेळी सत्ता होती, तेव्हा तुम्ही किती जमीन घेतली. अन आता शेवटी विरोधक काम करायला लागले आहे, पण आता हे न्यायालयिन प्रकरण आहे. त्यामुळे न्यायालय जो निर्णय देईल, आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. त्याचप्रमाणे अनिल परब यांचा रिसॉर्ट बेकायदेशीर असून लवकरच अनिल परब यांचा हिशोब चुकता होणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना दिला..
ते पुढे म्हणाले, कोरोना बाबत चौकशी करत असताना मुंबई पालिका आयुक्तांना भीती कसली वाटते. कोरोना काळातील ऑडिट करावेच लागणार आणि ऑडिट होणारच. संबंधितांनी परिवाराच्या नावाने कंपन्या काढल्या आणि कोविडमध्ये कमाई केली. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतः कॉर्पोरेट कंपनी बनवून कॉन्ट्रॅक्ट घेतलं. सुजित पाटकर यांनी कंपनीकडून 100 कोटी कॉन्ट्रॅक्ट मिळवलं, त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्तांनी आम्हाला कायदा शिकवू नये. अशा पद्धतीचा डिजास्टर मॅनेजमेंट ऍक्ट देशभरात आहे. कोरोना काळात यांनी दोन रुपयाची वस्तू दोनशे रुपयाला दिली. कोविड वॅक्सिंनमध्ये मुंबई महापालिकेने टेंडर काढले. सोबतच 11 कंपन्या काढल्या त्या सगळ्या बोगस होत्या. मग आता महापालिका आयुक्तांना नेमकं कोणाला वाचवायच आहे? हा प्रश्न असल्याचे सोमैय्या म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *