18 वर्षांपासून चोरीच्या दोन गुन्ह्यांत फरार आरोपी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट क्र. 2 ची यशस्वी कामगिरी

देवळाली कॅम्प ः प्रतिनिधी
गेल्या 18 वर्षांपासून चोरीच्या दोन गंभीर गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्र. 2 ने जेरबंद करून मोठे यश मिळवले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
नाशिक शहरातील चोरीच्या गुन्ह्यांतील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्र. 2 चे अधिकारी व अंमलदार सक्रियपणे तपास
करत होते.
तपासादरम्यान देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी बाळू रामचंद्र नांगरे हा अनेक वर्षांपासून फरार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोहवा मनोहर शिंदे व पोहवा चंद्रकांत गवळी यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदर आरोपी हा पाथर्डी फाटा परिसरात येणार आहे.
ही माहिती तात्काळ सपोनि/हेमंत तोडकर (प्रभारी) यांना कळविण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पथकाने पाथर्डी फाटा, नाशिक परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव बाळू रामचंद्र नांगरे (वय 39 वर्षे, रा. मु.पो. निमगण, स्वामी समर्थ मंदिराजवळ, धांदरफळ रोड, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे सांगितले.
सखोल चौकशीत आरोपीने संबंधित चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र. 2 कडील सपोनि/हेमंत तोडकर (प्रभारी), सपोनि/डॉ. समाधान हिरे, सपोउनि संजय सानप, पोहवा मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुरेकर, चंद्रकांत गवळी, पोहवा महेश खांदबहाले, प्रवीण वानखेडे आदींनी यशस्वीपणे पार पाडली.

Accused absconding in two theft cases for 18 years arrested

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *