सातपूरला महिलेची गळा चिरून हत्या आरोपी फरार

सातपूर प्रतिनिधी

सातपूर पोलीस हद्दीतील विधाते गल्ली येथे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एका 27 वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली. ही हत्या नेमकी कशासाठी करण्यात आली याचा शोध पोलीस घेत आहेत.

 अशोकती बाई बेग वय 27 वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या दोनच दिवसापूर्वी बेग विधाते गल्लीतील सुमन रघुनाथ नाटे यांच्या जुन्या घरी भाड्याने राहायला आलेल्या होत्या
           ही नेमकी हत्या कोणी केली व का केली याचा देखील तपास सातपूर पोलीस स्टेशन करीत आहे घटनास्थळी पोलीस उपयुक्त क्राईम प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख गुन्हे शाखेचे विजय ढमाळ यांच्यासह गुप्त विभागाचे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी अंमलदार उपस्थित होते यावेळी पोलिसांच्या मार्फत सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचे काम चालू होते पोलिसांनी आरोपी शोधण्याचे काम चालू केलेले आहे अधिक तपास सातपूर पोलीस करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *