महाराष्ट्र

महिलेला धमकावून चोरी करणारा आरोपी अटकेत

सिडको/ देवळाली : वि. प्र.
देवळाली कॅम्प परिसरात एका महिलेला आणि तिच्या लहान बालकाला जीवे ठार मारण्याची धमकी देत घरातील सोन्याचे दागिनेे व रोख रक्कम जबरदस्तीने लंपास करणार्‍या आरोपीस नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्र. 1 आणि 2 च्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण चार लाख 54 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 23 मे 2025 रोजी दुपारी दोनच्या सुमारास देवळाली कॅम्प येथील कास्गील इनक्लेव्ह इमारतीत अज्ञात इसमाने पाण्याचा प्रेशर चेक करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. त्यावेळी फिर्यादी महिला व तिचे लहान बाळ एकटे असताना आरोपीने त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. महिलेला जबरदस्तीने कपडे काढायला लावून तिचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले व ते व्हायरल करण्याची धमकी देत घरातील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाला होता. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घडलेल्या गंभीर गुन्ह्याची दखल पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी घेतली होती. गुन्हे शाखा युनिट 1 व 2 यांचे विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला. पोलिस हवालदार प्रशांत मरकड (युनिट 1) आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार (युनिट 2) यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सुशील अनिल ठाकूर (वय 21, रा. हरिधाम अपार्टमेंट, संसारीगाव) याला राका कॉलनी परिसरातून ताब्यात
घेण्यात आले. त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल फोन असा 1,36,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेले दागिने नाशिकरोड येथील एका सराफाकडे विकल्याची माहिती दिली. त्या आधारे पोलीसांनी 3,18,000 रुपयांचे सोने व चांदीचे दागिने सराफाकडून हस्तगत केले.
या यशस्वी कारवाईत गुन्हे शाखा युनिट क्र. 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पो. निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, हवालदार प्रशांत मरकड, प्रविण वाघमारे, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, उत्तम पवार, रमेश कोळी, रोहिदास लिलके, रविंद्र आढाव, विशाल देवरे, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, चालक समाधान पवार तसेच युनिट क्र. 2 चे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, मुक्तार पठाण, गुलाब सोनार, चालक सुनील खैरनार यांनी संयुक्तपणे केली. याप्रकरणी पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस
करत आहेत.

Gavkari Admin

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

2 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

4 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

22 hours ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

22 hours ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

22 hours ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

1 day ago