पवन एक्सप्रेसमध्ये माथेफिरूचा प्रवाशांवर अॅसिड हल्ला

 

मनमाड: आमिन शेख

-मुंबई -दरभंगा पवन एक्सप्रेस मध्ये एका माथेफिरूने प्रवाशावर ऍसिड ने हल्ला केल्याची घटना मनमाड येथे घडली अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशामध्ये खळबळ उडाली व प्रवासी व आरपीएफ पकडण्यासाठी गेले असता त्याला पकडण्यास आलेल्या आरपीएफ वर देखील माथेफिरूने ऍसिड फेकले या ऍसिड हल्ल्यात दोन आरपीएफ आणि दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले असुन या माथेफिरुला आरपीएफ ने ताब्यात घेतले असुन त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई हुन दरभंगाकडे जाणाऱ्या पवन एक्सप्रेस च्या वातानुकुलीत डब्यात एका माथेफिरूने प्रवाशावर ऍसिड ने हल्ला केल्याची घटना मनमाड रेल्वे स्थानकावर घडली असून अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशामध्ये खळबळ उडून भीती निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच आरपीएफ निरीक्षक शिरीष ढेंगे यांनी आरपीएफ पथकासह घटनास्थळी धाव घेऊन या माथेफिरूला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने आरपीएफच्या अंगावर देखील ऍसिड फेकले अखेर धाडस करून आरपीएफ यांनी या माथेफिरूला ताब्यात घेतले असून ऍसिड हल्ल्यात धर्मेंद्र यादव,विनायक आठवले हे दोन आरपीएफ आणि 2 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.पकडण्यात आलेल्या माथेफिरूचे नाव धनेशवर यादव असून तो भागलपूरचा आहे त्याने हे कृत्य का केले याचा रेल्वे पोलीस तपास करीत आहे.याआधी देखील असे माथेफिरूनी मनमाड रेल्वे स्थानकावर धिंगाणा घातला आहे.एकदा तर एका माथेफिरूने चक्क रेल्वेचे इंजिन सुरू करून काही अंतरते घेऊन गेला होता.आशा घटना घडू नयेत म्हणुन प्रवास करत असताना किंवा इतर वेळी आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे आणि यातच काही संशयास्पद घटना दिसल्यास त्वरित पोलिस किंवा इतरांना सांगवे असे आवाहन आरपीएफ तर्फे करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *