नाशिक : वार्ताहर
येत्या १ डिसेंबर पासून विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकीवरील अपघखत रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी हेल्मेट वापरा संदर्भाचे नागरिकांना आव्हान केले आहे.
शहरामध्ये हेल्मेट न वापरल्यामुळे रस्त्यावरील अपघातामध्ये ८३ मोटार सायकल स्वारांचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे. त्याच प्रमाणे गंभीर अपघातामध्ये २६१ दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झालेले आहेत. बरेच दुचाकीस्वाराचे अपघात रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्यामुळे होतात. रस्त्यावर डोके आपटून मृत्यू होण्याचे प्रमाणे अधिक आहे. दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे हे मोटार वाहन अधिनियम नुसार बंधनकारक आहे. हेल्मेट न वापरता दुचाकी वाहन चालविल्यास पाचशे- दंडाची तरतूद आहे. हेल्मेट वापरणे हे वैयक्तिक सुरक्षिततेच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे. हेल्मेट वापरल्यामुळे दुर्दैवाने अपघात झालाच तर डोक्याला व चेह-याला गंभीर इजा होत नाही. तसेच जीवीत हानी देखील होत नाही .
नाशिक शहरामध्ये प्रायोगिक तत्वावर पोलीसांनी राष्ट्रीय महामार्ग ३ गस्त वाढविल्याणे प्राणांतिक अपघातांमध्ये ब-यापैकी घट झाल्याचे दिसून आले आहे. वाढविलेल्या गस्तीमुळे काही वाहन चालकांचा जीव वाचलेला आहे. यापूर्वी देखील हेल्मेट वापराबद्दल पोलीस आयुक्तालयामध्ये वेळोवेळी मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. व त्या त्या वेळी अपघाताच्या संख्येमध्ये, प्राणांतिक अपघातामध्ये व गंभीर दुखापतीमध्ये घट झाल्याचे आढळून आलेले आहे.
शहरातील नागरिक कायदा व सुव्यवस्थेचे स्वंयस्फूर्तीने पालन करतात त्यामुळे सुजान नागरिकांना सक्ती करण्याची आवश्यकता पडत नाही. दुचाकीस्वारांचे होणारे अपघात व त्यामध्ये होणारी प्राणहानी, गंभीर दुखापत व त्यामुळे येणारे अपंगत्व या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणा-यांविरुध्द पोलीसांना नाईलाजास्तव कडक कारवाई करावी लागते. यामुळे पोलिस आयुक्तांनी नाशिककरांना दुचाकी वापरतांना हेल्मेट चा वापर करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
नाशिक शहरातील सर्व दुचाकीस्वारांना त्यांनी योग्य प्रतीचे हेल्मेट वापरून आपले दुचाकी वाहन चालवावे व वाहतूक नियमांचे पालन करावे .
०१ डिसेंबर 22 पासून नियमभंग करणा-या विरुध्द मोटार वाहन कायदा अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात येईल.
जयंत नाईकनवरे ,पोलिस आयुक्त