नाशिक

ढकांबे येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस ग्रामीण पोलीसांची कारवाई

 

आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोर अटकेत

नाशिक : वार्ताहर

दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत दिंनाक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी ढकांबे-मानोरी शिवारातील शेतकरी रतन शिवाजी

बोडके यांच्या मालकीच्या शिवकमल बंगल्यात मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात ६ इसमांनी प्रवेश करून बंदूक व चाकूचा धाक दाखवून

सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम ८ लाख ५० हजार रूपये असा एकूण १७ लाख ,३४ क्राईम रूपये किंमतीचा मुद्देमाल दरोडा

चोरून नेला होता. दिंडोरी पोलीस ठाण्यात

गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व

उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग कविता फडतरे यांनी सदर वस्तीवरील दरोडयाचा प्रकार गांभीर्याने घेवून

घटनास्थळी भेट देवून ३ वेगवेगळी पथके तयार केली होती. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सूचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ

यांनी पथकांनी घटनास्थळी मिळून आलेले भौतिक

पुरावे, उपलब्ध पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळवून नाशिक शहरातील संशयीत १) नौशाद

आलम फजल शेख, वय २५, रा. पंचशीलनगर झोपडपट्टी, नाशिक-पुणे रोड, नाशिक येथुन ताब्यात घेतले.

पोलिस चौकशीत नाशिक शहर व मध्यप्रदेश राज्यातील साथीदारांसह

त्यांचेकडील सफेद रंगाचे स्विफ्ट डिझायर कार व दुचाकीवर दिंडोरी रोडने ढकांबे-मानोरी परिसरात जावून एका अलिशान बंगल्यात

दरोडा टाकून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली असल्याची कबूली दिली.

गुन्हयातील साथीदार नामे २) रेहमान फजल

शेख, रा. राहुलनगर, जेलरोड, नाशिक, ३) इरशाद नईम शेख, रा. संजेरी रो-हाऊस, राजराजेश्वरी मंगल कार्यालय शेजारी,

जेलरोड, नाशिक, ४) लखन बाबूलाल कुंडलिया, ५) रवि उर्फ लालू देवीलाल फुलेरी, ६) इकबाल खान फारून खान, सर्व रा.रसुलपूर, देवास, जि. देवास, राज्य मध्यप्रदेश व ७) भुरा उर्फ पवन रतन फुलेरी, रा. इंदोर, राज्य मध्यप्रदेश येथील साथीदारांच्या मदतीने

गुन्हा केल्याचे सांगितले . यातील संशयित आरोपी क्र.२) रेहमान फजल

शेख, रा. राहुलनगर, जेलरोड, नाशिक, ३) इरशाद नईम शेख, रा. संजेरी रो-हाऊस, राजराजेश्वरी मंगल कार्यालय शेजारी,

जेलरोड, नाशिक, ४) लखन बाबूलाल कुंडलिया,

यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले. त्यांच्या कब्जातून

दरोडयाचे गुन्हयात चोरून नेलेले दागिन्यापैकी १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रु. ४ लाख ६० क्राईम – चा मुद्देमाल

हस्तगत करण्यात आलेला आहे.

यातील आरोपीतांविरूध्द महाराष्ट्र राज्यातील धुळे, औरंगाबाद, पुणे, नाशिक जिल्हयात तसेच मध्यप्रदेश राज्यात

दरोडा, जबरीचोरी व चोरी यासारखे मालाविरूध्दचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हयाचे तपासात यातील संशयित आरोपीतांकडून

आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यातील फरार संशयित आरोपींचा पोलीस पथक शोध घेत आहे. सदर

गुन्हयाचा पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करत आहेत.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे,

कळवण उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कविता फडतरे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे

पोलीस निरीक्षक .

हेमंत पाटील, दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोउनि अमोल पवार, पोउनि नाना

शिरोळे, सपोउनि रविंद्र वानखेडे, पोहवा नवनाथ सानप, जालिंदर खराटे, पोना विश्वनाथ काकड, सुशांत मरकड, बाळासाहेब

पानसरे, धनंजय शिलावटे, हेमंत गिलबिले, किशोर सानप, मंगेश गोसावी, प्रदिप बहिरम यांचे पथकाने दरोडयाचा गुन्हा

उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले.

सदर गुन्हयात पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी २५,००० रू.

चे बक्षीस जाहीर करून तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.

Ashvini Pande

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

22 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

22 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

22 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

23 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

23 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

23 hours ago