नाशिक : वार्ताहर
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहरातील अवैध धंद्याची माहिती घेत अवैधधंदे चालकांवर कारवाई करण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शाखा व युनिट 1, 2 च्या पथकांना आदेश दिले. यानंतर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापा टाकण्यात आला. या छाप्यात हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली.
गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1) हॉटेल कोबल स्ट्रीट सुला वाइन रोड 2) हॉटेल बारको, सुला
वाइन रोड 3) हॉटेल एअर बार,
कॉलेजरोड व मुंबईनाका पो.स्टे. हद्दीतील 4) डेटामॅटिक्स इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यात, भद्रकाली पो.स्टे. हद्दीतील 5) हॉटेल शांतीईन, गाडगे महाराज पुलाजवळ व इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील 6) हॉटेल तात्याबा ढाबा, गौळाणे रोड या ठिकाणी छापा टाकून हुक्का पार्लर चालविणारे व हुक्का पिणारे अशा एकूण 14 इसमांना ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणाहून 64 हजार 390 रु. किमतीचे हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ व साधने जप्त करण्यात आली. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त करण्यात आली. कारवाई यापुढेही चालू
राहणार आहे.
पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संजय बारकुंड, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, गुन्हे शाखा युनिट 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, गुन्हे शाखा युनिट- 2 तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेकडील व गुन्हे शाखा युनिट 1 व 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तरीत्या पार पाडली आहे.
मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी मनमाड : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात…
इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डीफाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून…
सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने…
नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५'चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा मागीलवर्षीच्या स्पर्धेतील विक्रम मोडीत, फूल मॅरेथॉनचे…
ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा सिडको : विशेष प्रतिनिधी असे…